Home [मुख्य पान]|Previous Issues [मागील अंक] | Advertise [जाहिरात]  | Register of Mandals [मंडळ नोंदणी] |

Contact Us [संपर्क] | Sanman [सन्मान] | Services [सेवा सुविधा] | NRI Remittances - Book  | Panthastha Farms  [पांथस्थ फार्म्स]

Panthastha Farm Stay

 

फार्म हाऊसची शांतता अनुभवण्यासाठी राहण्यासाठी सकाळची सायंकाळची वेळ योग्य. खरं तर 24 तासातील प्रत्येक तास एक वेगळा अनुभव देतो इथे. फक्त शांत बसायचे, निसर्गाचे अवलोकन करायचे, अंतर्मुख व्हायचे, वाटले तर चुलीवरचे किंवा गॅस वरचे जेवण चहा वगैरे इथेच बनवायचे. Detox व्हायचे. हवे तर विविध निसर्गोपचार घ्यायचे.*

 

इथे येऊन राहिल्याशिवाय अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. मोजक्या सोयी सगळ्या केल्या आहेत. वीज, गॅस, भांडी, गिझर, पाणी आहे, दोन स्वतंत्र बाथरूम कमोड सहित आहेत, तुमचे टॉवेल्स, बेडशीट, पांघरून, साबण, किरण, शिधा घेऊन या. दोन बेडरूम्स आहेत, मोठी ओसरी, टेरेस, मोकळे आकाश, मोठे अंगण 3 एकराचे शेत आहे. आपल्या रानात कडुनिंब, आंबा, सीताफळ, रामफळ, शेवगा, अवाकाडो, मोहोगनी, फणस, नारळ, कर्दळ, खजूर, कामिनी, वड, पिंपळ, रुद्राक्ष, औदुंबर, बेल, बाभूळ, चिंच, जांभूळ, रानजाई आहे. आसपास डाळिंब, द्राक्ष, केळी, ड्रॅगन फ्रुट वगैरे फळबागा आहेत. थोडा वानप्रस्थ, कृषी पर्यटन, फॅमिली गेट टुगेदर, योग शिबिर, कॉर्पोरेट ब्रेन स्टॉर्मिंग सेशन्स, detox, meditation, यासाठी योग्य आहे. तुम्हाला वाटले तर शेतीचे प्रयोग करा, हात पाय मातीने भरा, घाम गाळा. शहरात राहून नोकरदार कंटाळलेला आहे. त्याला मानसिक, शारीरिक बदलाची गरज आहे. हॉटेल, लॉज, रिसॉर्ट वगैरे मध्ये अमाप पैसा खर्च करूनही हा बदल मिळत नाही. अशी शांतता मिळत नाही. इथे RCC चा वापर कमीत कमी केला आहे. एक innovation lab इथे तयार करण्याचा विचार आहे. Sustainability चा इथे खास विचार अवलंब करीत आहोत. इतके मोठे स्वतंत्र वेगळे फार्महाऊस तर मिळणारच नाही. एका वेळी एकाच कुटुंबाने पूर्ण फार्महाऊस घ्यावे, रहावे दोन चार दिवस. आवडले तर जास्त दिवस. अगदी लेखक, कवी, कलावंत, वर्क फ्रॉम होम (स्टेकेशन), निवृत्त लोकांनी पंधरा दिवस येऊन राहिले तरी चालेल. ऑपरेशन झाले आहे, आठवडा, दोन आठवडे विश्रांतीची गरज आहे, येऊन राहा. अनिवासी भारतीय असाल, भारतात गाव कसा असतो, राहून अनुभव घ्यायचा असेल तर या सारखी जागा नाही. गावाशी कनेक्ट व्हा, विशेषत: गृहिणींना, मुलांना, पुढच्या पिढीला इथे आणा, त्यांना फाईव स्टार, मोबाईल, अतिशय स्ट्रेसफुल आणि आभासी वातावरणातून बाहेर काढून निसर्गाच्या सानिध्यात आणा. हेच तुमचे त्यांच्यासाठी मोठे गिफ्ट असेल.

 

आता पाऊस कमी झाला आहे. माफक थंडी आहे. मका छान आलाय. रिकाम्या रानात अजून मका पेरणार आहे. 21 प्रकारची झाडे लावली आहेत. 10- 12 प्रकारचे पक्षी आहेत. रान ससा आहे. मुंगूस कधी कधी दिसतो. पालखी मार्ग केवळ एक किमी आहे. कमीच. आसपास शेती आहे. अजिबात वर्दळ नाही. आपल्या जवळच्या दुसऱ्या रानात तर जंगलपण आहे, मोर तिथे राहतात.

लोकेशन - पांथस्थ फॉर्म्स, विठ्ठलवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. (पुण्यापासून 145किमी, पुणे सोलापूर हायवे)

Gen Z ला निसर्गायनाची भेट द्या, स्वतः तुम्हीही जाऊन राहा.

फार्म स्टे बुकिंग साठी संपर्क करा*

farmstay@Panthastha.com

WA   +91 834 933 1708

Mobile  +91 9860 678844

Terms and Conditions apply*